जळगाव :-शहरातील कासमवाडी परिसरात असणाऱ्या सम्राट कॉलनी मध्ये एका तरुणावर किरकोळ कारणावरून चोपरने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून गंभीर तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शुभम पुंडलिक महाजन (वय ३०, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्याला ललित दीक्षित व अन्य एक जणाने त्याच्या घराजवळ बोलाविले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर एकाने शुभमच्या मागील बाजूने उजव्या मांडीवर चॉपरने गंभीर वार केला. त्यात तो जखमी झाला. त्याला तत्काळ कुटुंबीयांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान तरुणावर झालेल्या हल्ल्याची माहिती कळतात एमआयडीसी पोलीस ठाणे घटनास्थळी धाव घेऊन रुग्णाला जाऊन जखमीची विचारपूस सुरू केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.