Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावातील गोळीबार प्रकरणी आठ जणांना अटक
    गुन्हे वार्ता

    जळगावातील गोळीबार प्रकरणी आठ जणांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 28, 2023Updated:July 28, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- – शहरातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या केसी पार्क येथे वाळू व्यावसायिकाच्या घरासमोर झालेल्या  गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर जळगाव शहरात खळबळ उडाली होती.

     

    पहिल्या फिर्यादीत, शुभम अशोक माने (वय २८, रा. के. सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याने म्हटले आहे कि, गुरुवारी २७ जुलै रोजी रात्री ७. ३० ते ८ वाजेदरम्यान संशयित आरोपी लखन दिलीप मराठे ऊर्फ गोलु रा. शिवाजीनगर हुडको, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे दोन्ही रा.हमालवाडा शिवाजीनगर, उमाकांत दत्तात्रय धोबी रा.संत मीराबाई नगर, समीर शरद सोनार रा. फॉरेस्ट कॉलनी, राजेश बंटी सदाशिव बांदल रा. उस्मानिया पार्क, चेतन रमेश सुशीर रा.मीराबाई नगर, महेश मराठे रा. हुडको, शिवाजीनगर, व आणखी एक यांनी आपसात कट रचुन फिर्यादी यास जिवे ठार – मारण्याची भिती घालुन खंडणीची मागणी केली. फिर्यादीकडुन संशयित आरोपी महेश मराठे याने त्याचे खात्यावर फोनपे च्या माध्यमातुन ६८,५००/-रुपये खंडणी स्विकारली.

    तसेच गुरुवारी फिर्यादीकडुन पैसे मागण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी फिर्यादीचे घराबाहेर प्राणघातक शस्त्रासह गैरकायद्याची मंडळी जमा करुन फिर्यादीचे घरावर दगडफेक केली. फिर्यादीचे घराचे नुकसान केले व फिर्यादीस शिविगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्याचे घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन संशयित आरोपी लखन मराठे याने त्याचेकडील बंदुकीने फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी मारुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय रविद्र बागुल हे करीत आहेत.

    दुसऱ्या फिर्यादीत, चेतन रमेश सुशीर (वय १९, रा. खोटे नगर, जळगाव) याने शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे कि, २७ जुलै रोजी रात्री ७. ३० ते ८ वाजेदरम्यान यातील फिर्यादी व साक्षीदार उमाकांत धोबी यांनी संशयित आरोपी शुभम माने यास काही महिन्यापुर्वी ८० हजार रुपये दिले होते. परंतु तो ते परत करीत नव्हता. म्हणुन फिर्यादी चेतन हे उमाकांत यांचेसह संशयित शुभम याचेकडे पैसे मागण्यास गेले असता,पैसे परत करणार नाही. पैसे मागितले तर जिवे ठार मारील असे म्हणुन शिविगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

    तसेच शुभम माने याने त्याचेकडील बंदुक फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने रोखली. तेव्हा दुसरा संशयित मयूर माने याने, यांची लय कटकट झाली. त्यांना जिवंत ठेवु नको अशी चिथावणी दिल्याने संशयित शुभम माने याने फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने २ गोळ्या झाडल्या व त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे. एपीआय रविद्र बागुल हे तपास करीत आहेत .

    यांना केली अटक

    चेतन रमेश सुधीर, राजेश बांदल, उमाकांत धोबी, समिर सोनार, लक्ष्मण शिंदे, लखन शिंदे, मयूर माने, शुभम माने या आठ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif