मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली धैर्यार रावण झाले आहे. काही वेळेपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले आहे. अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत असल्याची माहित समोर येत आहे. दौऱ्याच्या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. पण अचानक होत दिल्ली दौरा हा आता राजकीय वर्तुळात चर्चेचं विषय ठरणार आहे, मागील काही दिवसांत राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई आणि सगळ्यात महत्वाचं मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील राजकारण-समाजमन ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार?
३० सप्टेंबर रोजी बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची बैठक झाली होती. अचानक झालेल्या या बैठकीमुळे एकें चर्चांना उधाण आले होते. पितृपक्षाच्या पंढरवाड्यानंतर राज्यात सरकार एक महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही बैठक झाली होती. आता पितृपक्षानंतर नवरात्रोत्सव ही संपला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आमी महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

आमदार अपात्रता कारवाई?
आमदार अपात्रता कारवाई प्रकरणी सु्प्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी काही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.