ट्रक आणि कंटेनरची जोरदार धडक, २ गंभीर, १ जागीच ठार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

अपघातांचे सत्र कायम असून, भुसावळ तालुक्यातील फेकरी नजीक २५ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक माधव ट्रक व कंटेनरची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनरमधील दोन जण गंभीर जखमी आहे. हा अपघात सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.

सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहराकडे येत असलेल्या भरधाव ट्रक (जी.जे.12 बी.एच.5252) व भुसावळ कडून नागपूरकडे निघालेला कंटेनर (डब्ल्यू.बी. 11 ई.5686) यांच्यात सामोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. वाहनांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाहन चालकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या वाहनातील वाहन चालकासह क्लिनर जखमी झाला आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. भुसावळ तालुक्याचे हवालदार प्रेमचंद सपकाळे, श्यामकुमार मोरे, सादिक शेख, रशीद तडवी, शहर वाहातून शाखेचे राजेंद्र वाणी आदींनी वाहतूक सुरळीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.