कळमोदा येथे पुरातन महादेव मंदीराचे भुमिपुजन

माजी नगराध्यक्ष पांडुरग सराफ यांच्या हस्ते भूमिपूजन

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

फैजपुर येथील माजी नगर अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांच्या हस्ते कळमोदा येथील पुरातन महादेव मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. हे मंदिर गावात बऱ्याच वर्षापासून असुन पुरातन मंदीर आहे. मंदीर जीर्ण झालेल्या अवस्थेत होते त्यामुळे येथील शिवभक्त महिला मंडळातर्फे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला मंदीराचे भूमीपूजनाचा सन्मान फैजपूर येथील माजी नगरअध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांना मिळाला त्यावेळी आयोजक शिवभक्त महिला मंडळ कळमोदा येथील सर्व महीला मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.