जळगाव शहरात २३ वर्षीय गृहिणीचा चावा घेत विनयभंग करण्याचा प्रयत्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील तेवीस वर्षीय गृहिणीला वाद मिटविण्याचा बहाण्याने घरी बोलावून अंगलट करत व मानेवर चावा घेत आणि अंगविक्षेप करत विनयभंग केल्याची घटना घडली. संबंधित विवाहितेसह कुटुंबीयांशी पूर्वीचे वाद असल्याने संशयित दिगंबर उर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याने दुपारी १च्या सुमारास रस्त्यात अडवून वाद मिटवण्याचा बहाण्याने त्याच्या घरी बोलावले.

बोलावल्या प्रमाणे पीडित महिला घरी गेली असता काही कळण्याच्या आताच संशयिताने पीडितेशी अंगलट करत मानेजवळ पकडून चव घेतला. झटपट झाल्याने तोंडावर मारले, अंगावर नखांनी ओरबाडून कपडे फडात विनयभंग केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे स्वतःला सावरत थेट पीडितेने थेट जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यामुसार गुन्हा दाखल झाला असून, महिला पोलीस नाईक वंदना राठोड तपस करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.