२८ वर्षीय तरुणास मारहाण; जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील एका २८ वर्षीय तरुणास मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जुना कानळदा रोड लगत असलेल्या लक्ष्मी नगरातील गल्ली न २ मध्ये दि १९ रोजी संध्याकाळी जब्बार खान गफ्फार खान(२८) हा तरुण हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. त्यास १९ रोजी चौघांनी उसनवारीचे पैसे न दिल्याच्या रागात हातातील फरशीने तोंडावर व मानेवर मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना स्वप्नाली सोनवणे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.