धावत्या रेल्वेखाली आल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूची घटना समोर येत आहे. या संदर्भात रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, रावेल पोलीस ठाणाच्या हद्दीत असलेल्या रेल्वे क्रं ४७६ च्या रेल्वेखाली ५० वर्षीय व्यक्ती आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.५ रोजी उघडकीस आली. दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी हि घटना घडली असून, याबाबत रावेल पोलिसात घटनेची माहिती दिली आहे. त्यानुसार रावेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून रावेल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या संदर्भात रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास पो.हे.कॉ राजेंद्र राठोड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.