पुणे हादरलं; MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सध्या पुणेदेखील असुरक्षित झालेय.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर पुण्यातील टिळक रस्त्यावर तिघांनी कोयत्याने वार केले. आज पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार आणि त्याचे मित्र पुण्यातील सदाशिव पेठेतील अभ्यासिकेतून घरी जात असताना शक्ती स्पोर्टच्या समोर तीन जण दुचाकीवरुन आले आणि या मुलांना अडवलं आणि शर्टाची कॉलर पकडून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार रात्री दोन वाजता घडला. हल्ला करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या हल्लेखोराचं वय 25 ते 26 दरम्यान आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.