विद्यार्थ्याचे यश हेच एका शिक्षकाची खरी गुरु दक्षिणा असते : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिक्षकांना आपल्या दैनंदिनीत अनेक भूमिका बजावाव्या लागतात. पालक, सल्लागार, आदर्श व्यक्ती, मित्र आणि शिस्त लावणारा अशा अनेक भूमिका ते बजावतात. आजही अनेक शिक्षक आपल्या आदर्श पदपथावरून चालत एक आदर्श समाज निर्माण करण्याची परंपरा चालवत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते जितके सदृढ असेल तेवढे सक्षम नागरिक भविष्यात उभे राहणार आहेत. शिक्षक शिस्तप्रिय हवाच. मात्र,शिस्त अती करडी आणि अती ढिसाळ नसावी. विद्यार्थी शिक्षकांशी सहज हितगुज करेल असे त्याचे व्यक्तिमत्त्व असावे. तसेच विद्यार्थ्याचे यश हेच एका शिक्षकाची खरी गुरु दक्षिणा असते. त्यामुळे कर्तुत्वावर विश्वास ठेऊन वेळेला समोरे जाऊन यश प्राप्त करा असे मत संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट, अभियांत्रिकी व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित सर्व प्राध्यापकांचे पुष्प व संदेश लिहिलेले शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले. हा कार्यक्रमात महाविद्यालयातील विध्यार्थ्यानीच आयोजित केला होता. यानंतर या कार्यक्रमात जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना शिक्षकाचे आयुष्यातील महत्व पटवून दिले. जग हे स्पर्धेचे आहे त्यामुळे आपला टिकाव लागण्यासाठी बुद्धीने तल्लक झाले पाहिजे तसेच कर्तुत्वावर विश्वास ठेऊन वेळेला समोरे जाऊन यश प्राप्त करा असे मत प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात संगीत विभागाच्या विध्यार्थ्यानी गुरुप्रती आदर व्यक्त करणारी गीते सादर केली. तसेच प्राध्यापकामध्ये विविध स्पर्धा घेत कार्यक्रमात रंगत आणली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील श्रावणे, देवश्री भक्कड या विध्यार्थ्यानी केले तर सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.