चाळीसगाव शहर पोलीसांकडून सराईत चोरटा जेरबंद

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

घरफोडी आणि गणेश मंदीराची दानपेटी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. युवराज साळुंखे (रा. संजय गांधी नगर, चाळीसगाव) असे चोरट्याचे नाव आहे.

चाळीसगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२३ रोजी रिंकेश हरीनाम पवानी (रा. सिंधी कॉलनी, चाळीसगाव) यांनी चोरीची खबर दिली.  अज्ञात आरोपीने  रोजी ४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून २० हजार रु. किमतीचा मोबाईल चोरी केला आहे. सदर खबरीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे  भादवी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ  योगेश बेलदार व पोना  दिपक पाटील यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली.

दरम्यान पोना दिपक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिड महिन्यापुर्वी जेलमधुन जामिनावर सुटुन आलेला सराईत चोरटा युवराज साळुंखे  सदर परीसरात रात्रीवेळी संशयास्पद फिरत होता. सदर आरोपी हा घरफोडी करण्यात सराईत असल्याने तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे यापूर्वी त्याचेवर चार चोरीचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपीवर अधिक  संशय बळावल्याने लागलीच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी  पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, गणेश कुवर, मोहन सुर्यवंशी, शरद पाटील, प्रविण जाधव यांनी मा. पोलीस निरीक्षक सो. संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा चाळीसगाव शहर परीसरात शोध घेतला.

त्यांनतर पोना दिपक पाटील व पोकॉ अमोल भोसले यांना खबर मिळाली की, सदर आरोपी हा रेल्वेने परगावी पळुन जाण्याच्या तयारीत आहे. म्हणून तात्कळ  त्यांनी स्टाफसह जावुन युवराज साळुंखे यास रेल्वे प्लॅट फॉर्म जवळुन पळुन जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याबाबत कबुली देवुन गुन्ह्यातील चोरलेला २०,०००/- रुपये कि.चा मोबाईल फोन काढुन दिला आहे. तसेच सदर आरोपीताने चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्स जवळील गणेश मंदीराची दान पेटी चोरी केल्याची माहीती दिली आहे. तरी सदर आरोपीतास सदर गुन्यात अटक करण्यात आली असून  कोर्टासमोर पेश करून त्याचेकडुन अधिक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याने त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्याची तजविज ठेवण्यात आलेली आहे.

सदर आरोपीताचे गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता सदर आरोपीतास लवकरच हद्दपार करण्याची कार्यवाही चाळीसगाव शहर पोलीसांकडुन करण्यात येणार आहे. सदर गुन्हा मा. पोलीस अधिक्षक सो. एम राजकुमार मा. अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक  अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीसांनी उघडकीस आणला असून सदर गुन्ह्याचा तपास पोना दिपक पाटील व पोकों अमोल भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.