दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

हॉटेल बलराम परिसरात दरोडा व चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन दोरी आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील हॉटेल बलराम जवळील परिसरात अंधाराचा फायदा घेत चोरी व दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश अमळनेर पोलिसांनी मध्यरात्री उधळून लावला आहे. त्यांच्याजवळ असलेले धारदार चाकू, लोखंडी टॅमी, नायलॉन दोरी, मिरचीची पूडच्या मदतीने चोरी किंवा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होते. यातील जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा ता. एरंडोल संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे तिघे रा. पिंपळकोठा करडोणे रा. मुंबई आणि भटू दिलीप पाटील रा. पैलाड, अमळनेर अशा इतर ५ साथीदारांची नावे सांगितले. पोलिसांनी संशयित आरोपीकडून ७० हजार रूपये किंमतीची दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन द्वारे आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.