उघड्या घरातून १५ हजारांची रोकड लांबविली

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

उघड्या घरातून १५ हजाराची रोकड आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील नशेमन कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिसाहक इब्राहिम रंगरेज (वय-७०) रा. नशेमन कॉलनी, जळगाव हे राहत असून सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे घर उघडे असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरात ठेवलेले १५ हजाराची रोकड आणि बँकेचे पासबुक, चेकबुक असे साहित्य चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर हिसाहक रंगरेज यांनी मंगळवारी ११ वाजता रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.