जळगावात चोरटयांनी बंद घर फोडले ; हजारोंचा ऐवज लंपास

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

बंद घर फोडून चोरट्याने ८५ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दानिगे, देवांच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार स्टेट बँक कॉलनीत उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप आबाजी सोरटे (वय-५७) रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह राहत असून ५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे व चांदीचे दागिने, चांदीच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा एकुण ८५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार १० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आला. प्रदीप सोरटे यांनी मंगळवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ सुशिल चौधरी पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.