हात उसनवारीचे पैसे न दिल्याने एक वर्षांची शिक्षा ; पाच लाखांचा नुकसान भरपाईचा आदेश

0

जळगाव : – फौजदार विजय एकनाथ कोळी यांना हात उसनवारीने दिलेल्या तीन लाख रुपये परत न केल्याने न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. तसेच पाच लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिले असून रक्कम न दिल्यास पुन्हा तीन महिन्याची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील सेवानिवृत्त फौजदार हंसराज पद्मसिंह हजारी ठाकूर यांनी फौजदार विजय एकनाथ कोळी यांना दि. २८ जानेवारी २०१९ मध्ये हातउसनवारीने तीन लाख रुपये दिले होते. ही रक्कम समाधान पाटील, आसिफ खान गप्पार खान यांच्या समक्ष परत करण्याच्या बोलीवर दिली होती. पैशांची मागणी केल्यानंतर विजय कोळी याने २ लाख ७३ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. परंतू तो धनादेश वटला नसल्याने हंसराज हजारी यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली नोटीस मिळून सुद्धा आरोपीने सदरची रक्कम दिली नाही.

त्यानुसार हंसराज हजारी यांनी मे. तीसरे जुडेशियल मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी याचा तोंडी पुरावा नोंदवण्यात आला. सर्व कागदपत्रे शाबित करून मे. तीसरे जुडीशियल मॅजिस्ट्रेट यांनी विजय कोळी यांना दोषी ठरविले. त्यानंतर न्यायाधीश जान्हवी केळकर यांच्या न्यायालयाने विजय कोळी यांना एक वर्षाची शिक्षा व पाच लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिले. रक्कम न दिल्यास पुन्हा तीन महिन्याची शिक्षा ठोठवण्यात येऊन फिर्यादीस न्याय मिळाला. फिर्यादीतर्फे अॅड. रघुनाथ आर. गिरणारे व अॅड. हेमंत आर. गिरणारे यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.