CWC 2023 मध्ये रणवीर सिंह चमकणार…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतात ५ ऑक्टोबर पासून यंदाचा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अशातच आयसीसीने (ICC) एक पोस्ट शेयर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यांनी अभिनेता रणवीर सिंह ला एक महत्वाची जबाबदारी दिल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. रणवीर सिंह नेमका वर्ल्ड कपमध्ये काय करणार आहे? असा सवाल सर्वांनाच पडला आहे.

https://twitter.com/ICC/status/1704111027770507446?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1704111027770507446%7Ctwgr%5E74d0218e67d1a20ae68e6d1c4e537a181f48a8f5%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fsports%2Franveer-singh-will-be-the-leading-character-in-the-icc-anthem-for-the-2023-world-cup%2F747039

उद्या दुपारी 12 वाजता वर्ल्ड कपचं अँथम सॉग रिलीज होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रणवीर सिंह दिसतोय. त्याची झलक आयसीसीने ट्विट करत दाखवली आहे. दिल जश्न बोलो… असं या गाण्याचं नाव आहे. यामध्ये रणवीर डोक्यावर हॅट घालून नाचताना दिसतोय. डोळ्यांवर गॉगल अन् निळ्या ड्रेसमध्ये रणवीर दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.