बापरे.. 19 लोकांची शिकार; नरभक्षक वाघ जेरबंद

0

गडचिरोली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

19 लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सी टी 1 नरभक्षी वाघाला (CT 1 Tiger) गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आले आहे. गडचिरोलीतील 13, गोंदिया 2, भंडारा जिल्ह्यात 4 लोकांचा या नरभक्षी वाघाने फडशा पाडला होता. एकूण 19 लोकांना या वाघाने ठार केले.

वाघ पिंजऱ्यात बंद

मागील महिन्याभरापासून या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या टीम जंगलात ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र पावसामुळे वाघाला जेरबंद करण्यात अडथळा निर्माण होत होता. मात्र आज सकाळी वनविभागाच्या सापळ्यात अडकताच शूटरने बेशुद्धीच इंजेक्शन देऊन नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आले. यामुळं नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे. वाघ पिंजऱ्यात बंद झाल्याची माहिती मिळताच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

जवळपास 27 नागरिक ठार

चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली या भागात बिबट्या आणि वाघाची दहशत नेहमीच कायम असतो. या वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 27 नागरिक ठार झाले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी पालकमंत्र्यांना समोर दिली.

शेतकर्‍यांचे अनेक कुटुंब उध्वस्त

नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकर्‍यांचे अनेक कुटुंब उध्वस्त झाले होते.  मृतक शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी आणि ही मदत मोठ्या स्वरुपात देण्यात यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.