अचानक केबिन कॉकपिटमध्ये धूर; विमानाचे आपत्कालीन लँडिंग… (व्हिडीओ)

0

 

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गोव्याहून (Goa) येणाऱ्या स्पाइसजेटच्या (Spice Jet) विमानाचे बुधवारी रात्री ११ वाजता हैदराबाद (Hydrabad) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. केबिन आणि कॉकपिटमध्ये धूर दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

सुदैवाने विमान सुखरूप उतरले आणि कोणत्याही प्रवाशाला धोका नसून सर्व प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटने उतरवण्यात आले. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डि-बोर्डिंग करताना एका प्रवाशाच्या पायाला किरकोळ ओरखडे पडले आहेत.हैदराबाद विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, स्पाईसजेटच्या Q400 विमान VT-SQB मध्ये 86 प्रवासी होते. आणि आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्यासाठी नऊ उड्डाणे वळवावी लागली.

स्पाइसजेट विमानात बसलेल्या एका प्रवाशाने धुराने भरलेल्या केबिनचे छायाचित्र आणि हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंगचे दोन व्हिडिओ ट्विट करून आपला अनुभव शेअर केला. स्पाइसजेटला अलीकडच्या काळात ऑपरेशनल आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे आधीच डीजीसीएच्या (DGCA) देखरेखीखाली आहे. नियामकाने एअरलाइनला 29 ऑक्टोबरपर्यंत एकूण 50 टक्के उड्डाणे चालवण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारी डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नियामक या घटनेची चौकशी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.