माझ्यावर २५ वर्षात भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही -नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली ;- आपल्या मुलांसाठी प्रचंड संपत्ती जमवली आहे. परंतु मी मौजेसाठी नव्हे तर मिशनसाठी जन्मलो आहे. माझ्याकडे तर स्वतःचे घरच काय, साधी सायकलसुद्धा नाही. गेली २५ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आधी काँग्रेसचे भित्रे सरकार जगासमोर रडायचे. आज पाकिस्तान जगासमोर जाऊन रडतो, असेही ते म्हणाले.

झारखंड आणि बिहारमधील प्रचारसभांमध्ये शनिवारी मोदींनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर घराणेशाहीच्या मुद्यावरून टीका केली. एक युवराज दिल्लीत बसले आहेत तर दुसरे युवराज पाटण्यात आहेत. दोघेही देशाला आपली जहागिरी समजतात. हे युवराज तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मुलांसाठी प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. माझ्यासाठी मात्र देशाची जनताच माझे कुटुंब आहे. माझ्याकडे ना सायकल आहे ना घर आहे. माझे घर, कुटुंब, वारसदार तुम्हीच आहात. मला तुम्हाला वारशात विकसित भारत द्यायचा आहे. मोदी मौजेसाठी नाही तर मिशनसाठी जन्माला आला आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून गेली २५ वर्षे काम करताना भ्रष्टाचाराचा एकही डाग माझ्यावरनाही, असे मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.