पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आजच्या काळात सोशल मीडियाचा जर सद्पयोग केला तर बरेच काही चांगले घडु शकते, याच गोष्टीची प्रचिती पारोळा येथे आली. सोशल मीडियामुळे दानपेटी चोर काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरातील गुजराथी गल्ली भागातील सार्वजनिक गणपती मंदिरात दि १७ रोजी दुपारी एका सोळा वर्षीय तरुणाने दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्याने गाभाऱ्यातील दान पेटी चोरी केली, परंतु तो मंदिर परिसरातील सी.सी.टी.वी मध्ये कैद झाला होता. दरम्यान मंदिराचे विश्वस्त पंकज गुजराथी, मिलिंद नावरकर, नीरज गुजराथी, राहुल नांदेडकर आदींनी सदर सि.सि.टि.व्ही चे फुटेज चेक करून ते सोशल मिदैयाच्या मध्यमातून शहरातील अनेक गृपवर पाठविले होते.
यामध्ये आरोपीचा चेहरा, पाठीमागे असलेली बॅग, वेश भूषा ही स्पष्ट दिसत असल्याने दि. १८ रोजी सदर आरोपी हा किसान महाविद्यालय परिसरात फिरत असताना प्रा डॉ प्रदीप अहुजेकर यांनी त्यास ओळखले. आणि त्यांनी ही सदर बाब मंदिराचे विश्वस्त यांना सांगितली. दरम्यान त्याचा पाठलाग करून त्या चोरास नवनाथ मंदिर परिसरात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपी चे नाव आकाश संतोष पाटील असून तो अवघ्या १६ वर्षाचा आहे. तो चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील असल्याचे समजले. चौकशी दरम्यान त्याने यापूर्वी अनेक चोऱ्या केल्याचे कबूल केले. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.