Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात
    ताज्या बातम्या

    शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 25, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पुणे- शाळेत शिरून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम ताब्यात . एका मुलींच्या शाळेत शिरुन, ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जनवाडी येथील एका दारू गुत्यावरून रात्री ताब्यात घेतले. मंगेश तुकाराम पदुमले (वय ३६, रा. गुंजाळवाडी, पांडवनगर) असे या नराधम आरोपीचे नाव आहे. मंगेश हा शाळेजवळच्या एका शोरुममध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

    मुलींनी सांगितलेल्या वर्णनावरुन त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. यावरुन युनिट १च्या पथकाने सर्वत्र शोध सुरु केला. यात हा येथील एका शोरुममध्ये एकच दिवस कामाला आल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश बामगुडे यांच्या पथकाने जनवाडीतील एका दारु गुत्यावर त्याला पकडले.

    ही घटना एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा-साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्‍या एका ४० वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

    फिर्यादी यांची ११ वर्षाची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकते. ती बुधवारी सकाळी शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करून तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले आणि तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.

    या घटनेनंतर संबंधित मुलीने आपल्या मैत्रिणीला हा संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. यावर, त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत घटनेची माहिती घेतली होती.

    #police #school crime news pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif