महागाईचा फटका.. आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे, यामुळे सर्वसामान्यांना महागाईची मोठी झळ बसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Russia-Ukraine war) सुरु असल्याने सर्वच बाजारपेठेवर परिणाम होतांना दिसत आहे. म्हणून गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसह पेट्रोल आणि डिझेलच्या देखील दरात वाढ होतेय.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 76 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढवण्यात आले आहेत.

चालू आठवड्यात प्रथमच इंधनाच्या (Fuel) किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तर गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

इंधनाच्या वाढलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.81 रुपये तर डिझेलचा दर 89.07 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रल 112.51 तर डिझेल 96.70 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्रति लिटर दर अनुक्रमे 103.67 आणि 93.71 रुपये लिटर आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल 107.18 आणि डिझेल 92.22 रुपये प्रति लिटर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.