अमळनेर रेल्वेस्थानकावर फेरीवाल्यांची दबंगगिरी; दोन रेल्वे पोलिसांना केली मारहाण

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीर चणे, फुटाणे आणि पाणी बॉटल विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या दोन सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकुमार महाराम जाटव व देवेंद्र जयलाल नेने हे दोन सुरक्षा बलाचे कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यासाठी २३ रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता स्टेशन बाहेर पाळत ठेवून असताना यापूर्वी वारंवार स्टेशनवर खाद्य पदार्थ विक्री करणारा नासिर शेख आमिर शेख व साहिल नासिर शेख (रा. ख्वाजामिया नगर, अमळनेर) हे दोघे आले.

यावेळी आम्हाला स्टेशनवर व्यवसाय करू देत नाही म्हणून शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण करत असतांना तेथे वरिष्ठ अधिकारी आले. यावेळी आरोपी पसार झाले. दरम्यान या दोन्ही सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना उपचारसाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे. जाटव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.