पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यात घर घेण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी पाचोरा येथील माहेरवाशिणीचा भरुच (गुजरात) येथे सासरी शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत विवाहितेने पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील रेणुका काॅलनीतील रहिवाशी वैष्णवी हिचा विवाह वैभवकुमार परशुराम जगताप याचेशी ८ डिसेंबर २०२२ रोजी भरुच (गुजरात) येथे झाला होता. लग्नानंतर एक महिना चांगली वागणूक मिळाल्यानंतर पुण्यात घर घेण्यासाठी माहेरहुन १५ लाख रुपये आणावे अशी मागणी सासरच्या मंडळींकडून वैष्णवी हिच्याकडे होवु लागली. या कारणावरून वैष्णवी हिस मारहाण देखील करण्यात येत होती.
मात्र वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हिच्या फिर्यादीवरून वैभवकुमार परशुराम जगताप (पती), परशुराम जगताप (सासरे), रत्नाबाई परशुराम जगताप (सासु) रा. डी. ११, रंगदर्शन सोसायटी, मोरारी नगर जवळ, लिंक रोड, भरुच (गुजरात), स्नेहल भांमरे (नणंद), धवलकुमार भांमरे (नंदोई), मिनाबाई पवार (चुलत आत्या) रा. बडोदा यांचेविरूद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहे.