जळगाव:- तालुक्यातील वडनगरी येथे शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप शर्मा यांच्या कथेचे आयोजन 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून आज पंडित प्रदीप शर्मा यांनी शिव महापुरान कथा श्रवण करणारा भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो त्यांना महादेवाचा आशीर्वाद मिळतो .असे प्रतिपादन केले.
आज शिव महापुराण कथेचा दुसरा दिवस असल्याने काल पहिल्या दिवशी जिल्हा राज्य आणि देशातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आजही हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वत्र वातावरण शिवमय झालेले दिसून आले.
पुढे बोलताना पंडित प्रदीप शर्मा म्हणाले की, इथे सात दिवस कथा ऐकणाऱ्या भाविकांना शेवटच्या दिवशी विचारल्यास त्यांना शंकर देवाची प्राप्ती होते. साप विंचू चावल्यास त्यावर इलाज होऊ शकतो मात्र माणूस चावल्यावर त्याचा इलाज नाही. कारण माणसाच्या मनामध्ये प्रचंड द्वेष निर्माण झालेला असतो. कोणाची झालेली प्रगती पाहून त्याचा जळफळाट होत असतो. जेवढे फिश साप आणि विंचू मध्ये नाही तेवढे विष माणसाच्या मनात पेरले जात असल्याचे पंडित प्रदीप शर्मा यांनी सांगितले.