वन कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

0

यावल ;- सातपुडा वनक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या देवझीरी कार्यक्षेत्रात हंडया कुंडया नियतक्षेत्र क्रमांक१६६व१७७ येथे अवैद्यरित्या सागवानच्या वृक्षांची कत्तल करून ठेवलेले ४८नग जप्त करून कारवाई केल्याप्रकरणी या वृक्षतोडील संशयीत कांतीलाल गुलाब पावरा याने वन कर्मचारी यांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की , सातपुडा वनक्षेत्रात देवझिरी वन परिक्षेत्रात येणार्‍या हंडया कुंडया या क्षेत्रातील अवैद्यरित्या नियतक्षेत्र कक्ष १६६व१७७या ठीकाणा हुन सुमारे ४८ सागवान वृक्षांची तोड केले करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

यानंतर, या क्षेत्रात वनपाल म्हणुन कार्यरत असलेले वनरक्षक विजय मोत्या पावरा, वनसेवक रविन्द्र बारेला व संजय बारेला यांना दिनांक १३ मार्च रोजी वृक्षतोड प्रकरणात संशयीत असलेला आरोपी कांतीलाल गुलाब पावरा राहणार खैर कुंडीपाडा या व्यक्तिने देवझिरी वनपरिक्षेत्र येथील कार्यालयात येवुन त्या ठीकाणी कर्तव्यावर कार्यरत असलेले वन कर्मचारी तोड केलेले वृक्ष तुम्ही का उचलुन का आणले असे विचारणा करीत धमकी दिली. माझ्या रस्त्यात आले तर मुंडके उडवुन देईल असे बोलवुन शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत भादंवि कलम ३५३ ,३२३ , ५०४, ५०६ , ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एकीकडे मानव आणी जंगल सहसंबध जंगल वाढीसाठी स्थानिक लोकांचे जिवनमान उंचाविण्यासाठी वनविभाग विविध योजनांच्या माध्यमातुन पाऊल उचलत असतांना काही स्थानिक निघ्नसंतोषी मंडळी कडून विरोध आणी क्रूर भावनेने वन विभागास उत्तरे देतांना दिसुन येत आहे . सातपुडयातील वनजमिनी वरील नव्याने वृक्षतोड करून वनजमिनीच्या मिळवण्याच्या नांवाने वनजमीन आपल्या नावावर होइल, पट्टे मिळतील अशी चुकीची व खोटी समजुत स्थानिक राहणार्‍या बांधवांमध्ये आहे. तरी अशा खोटया गोष्टींना बळी पडून आपल्या जंगलातील वृक्षांची तोड करू नये असे आवाहन वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांनी स्थानिक रहीवाशी नागरीकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.