सावधान कुत्रे पाळताय ? ‘या’ 23 कुत्र्यांच्या जातींवर घातली बंदी

संपूर्ण यादी तपासा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही कुत्रा पाळण्याच्या विचारात असाल किंवा तुम्ही कुत्रा पळाला असेल तर सावधान.. ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशभरात सध्या आक्रमक कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांवर हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी दाखल घेत केंद्र सरकारने बुधवारी 23 ‘उग्र’ कुत्र्यांच्या जातींच्या आयात, विक्री आणि प्रजननावर बंदी घातली आहे.

रॉटवेलर, पिटबुल, टेरियर, लांडगा कुत्रे, रशियन शेफर्ड आणि मास्टिफ या जाती मानवी जीवनासाठी धोकादायक मानल्या जातात. या बंदीमध्ये या उग्र जातींच्या मिश्र आणि संकरित जातींचाही समावेश होतो. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला प्रतिसाद म्हणून तज्ञ आणि प्राणी कल्याण संस्थांच्या संयुक्त समितीने दिलेल्या अहवालानंतर हे पाऊल उचलण्यात आले. न्यायालयाने केंद्र सरकारला तीन महिन्यांत सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना बंदी लादण्याची खात्री करण्यासाठी पत्र पाठवले आहे. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने अशा प्रकारच्या श्वानांच्या जातींच्या आयातीवर बंदी घालण्याची शिफारसही या पत्रात करण्यात आली आहे.

बंदी घातलेल्या कुत्र्यांच्या जाती

बंदी घातलेल्या कुत्र्यांच्या जातींच्या यादीमध्ये पिटबुल टेरियर, टोसा इनू, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर, फिला ब्रासिलिरो, डोगो अर्जेंटीनो, अमेरिकन बुलडॉग, बोअरबोएल, कांगल, मध्य आशियाई शेफर्ड डॉग, कॉकेशियन शेफर्ड डॉग, साउथ रशियन शेफर्ड, टोर्नजाक, सरपलान, जॅप्लानस, टोर्नजाक यांचा समावेश आहे. आणि अकिता, मास्टिफ्स, रॉटविलर, टेरियर्स, रोडेशियन रिजबॅक, वुल्फ डॉग्स, कॅनारियो, अकबाश डॉग, मॉस्को गार्ड डॉग, केन कॉर्सो आणि सामान्यतः ‘बॅन डॉग’ म्हणून ओळखले जाणारे प्रत्येक कुत्रा.

वरील कुत्र्यांच्या जाती, क्रॉस ब्रीड्ससह, आयात करणे, प्रजनन करणे, पाळीव कुत्रे म्हणून विक्री करणे आणि इतर कारणांसाठी प्रतिबंधित केले जातील,” असे पत्र तज्ञ पॅनेलच्या शिफारशींचा हवाला देत म्हटले आहे. केंद्र सरकारने डॉग ब्रीडिंग अँड मार्केटिंग नियम 2017 आणि पेट शॉप नियम 2018 ची अंमलबजावणी करण्याचेही आवाहन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.