कुंड्यापाणी येथे अवैध लाकडांची वाहतूक

0

यावल ;- गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल अडावद वनपाल कुंड्या पाणी पथकासह कुंड्या पाणी वर गव्हाण रस्त्याने 14 रोजी गस्त घालत असताना एक अज्ञात इसम मोटर सायकलने अवैध वाहतूक करताना दिसला . त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन व मुद्देमाल रस्त्याच्या बाजूला फेकून पसार झाला. जप्त मुद्देमाल साग अनगड बेलन 310 एक विना नंबर प्लेट बजाज कंपनीची मोटर सायकल आढळून आली

. सदरची कारवाई उपवनसंरक्षक यावल जमीर शेख , सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अडावद प्रशांत साबळे, वनपाल कुंड्या पाणी भावना चव्हाण, वनरक्षक समीर तडवी ,इंद्रसिंग पावरा, वनमजूर हैदर तडवी,संजय माळी तसेच वनमजूर यांनी केली .

Leave A Reply

Your email address will not be published.