सातपुड्यातील यावल अभयारण्य परिसरात काटेसावर सोबतच दुर्मिळ सोनसावर फुलला

0

जळगाव ;- सातपुड्यातील यावल अभयारण्य परिसरात नेहमीच निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. वाघ, बिबट, अस्वलाचे अस्तित्व असलेल्या यावल अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर देखील फुलला आहे.

यावल वनविभागातील वनपारिक्षेत्र अधिकारी अजय बावणे व वनरक्षक युवराज मराठे यांना जंगल गस्ती दरम्यान हा वृक्ष बाहरलेला दिसून आला.या वृक्षाचे मराठी मध्ये गणेरी असे म्हणतात.हा मध्यम आकाराचा असून पानझडी या प्रकारामध्ये मोडतो.हा वृक्ष भारतात मर्यादित भागात च आढळतो. जानेवारी महिन्यातील या वृक्षाची पानगळ होऊन फेब्रुवारी महिन्यात याला मोठी सोनेरी पिवळ्या रंगांची फुल येतात.हा वृक्ष फक्त डोंगरावर वाढणारा असून त्याची रोपे तयार करायची असल्यास ते सहजासहजी तयार होत नाहीत.

हा वृक्ष अतिशय उपयुक्त असा आहे इंग्रजी मध्ये याला असेही म्हणतात कारण त्याची वाळलेली लाकडे भुरुभुरू जळतात व खुप वेळ जळतच राहतात. या वृक्षाच्या फांद्यामध्ये विशिष्ठ प्रकारचे तेल असते म्हणून याचा वापर रात्रीची जंगलात भटकंती करताना मशाली म्हणून पूर्वी च्या काळी केल्या जात असे.याचे फळ हे वांग्याच्या आकाराची असून व जांभळ्या रंगाची असतात.फळे पक्व झाल्यावर फळांना करडा रंग प्राप्त होतो.या फळांमध्ये असलेला कापुस खुप मुलायम व क्रीम रंगाचा असतो. साध्या व काटेसावरा च्या कापसापेक्षा देखील हा सोनसावराचा कापुस मुलायम असतो.या वृक्षाला धार्मिक महत्त्व देखील असून श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणात आढळतो.या वृक्षाला डिंकाला कथल्या गोंद असे म्हणतात हा डिंक सुद्ध औषधी उपयोगाचा आहे.या सोबतच याची साल व पाने देखील औषधी गुणधर्मयुक्त अशी आहेत.यांच्या सालिमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे यापासून दोरखंड तयार करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.