EVM वर निवडणूक..? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात लोकसभेच्या तोंडावर आल्या असून सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत मोठा मोठा निर्णय दिला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दल नेहमी ओरड होत असते.  देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्न उठवतात. तसेच पराभव झाला की, EVM मशीनमुळे आपण हरलो, या मशीनमध्ये घोटाळा करुन विजय मिळवता येतो, असा काही नेत्यांचा, पक्षांचा दावा असतो. म्हणून  EVM च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आक्षेपाच्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. ईव्हीएम बाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.