शिंदेची मध्यरात्री गुप्त दिल्लीवारी; चर्चांना उधाण

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत भाजपचा पाठींबा मिळवून सत्ता स्थापन केली.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री (DYCM Devendra Fadnavis) पदाची शपथ घेतली. या शपथविधीला अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्यापही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचे दिल्ली दौरे सुरु आहेत.

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मध्यरात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (union home minister amit shah) यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र या भेटीची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. 31 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  तसेच या वृत्तामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आल्याचं दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.