मुख्यामंत्र्यांचा अयोध्या दौरा, ठाकरे गटावर साधाला निशाणा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संध्यातरी अयोध्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस आणि शिंदेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रॅली संपल्यानंतर झालेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डीवचलं, राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे रावण होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत भगवेमय वातावरण झाले आहे. प्रभू रामजींचा धनुष्यबाण घेऊन आम्ही आलो आहोत. मुख्यमंत्री बनल्यानंतर मी पहिल्यांदा अयोध्येत आलो आहोत. अयोध्येत राम मंदिर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न केले आहे. जे मंदिराविषयी विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हनुमाण चालीसा पठण करणारे रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांना देशद्रोहाचा आरोप लावून तुरूंगात टाकण्याचे पाप करणारा राम होते की रावण?, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.