जळगावात तरुणीचा सिनेस्टाइल धिंगाणा; प्रियकराच्या घरात घुसून त्याच्याशी लग्न…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आजवर आपण अनेक चित्रपटांतून बऱ्याच तारकांना हिरोसोबत लग्नासाठी त्याच्या व आपल्या घरच्यांसोबत धतींगगिरी करतांना पाहिलेय. मात्र असाच एक सिनेस्टाइल धिंगाणा जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे घडला आहे. प्रेयसी थेट आपल्या प्रियकरासोबत लग्न करून द्यावे, असे म्हणत एका तरुणीने सिनेस्टाइल प्रियकराच्या घरी जात धिंगाणा घातला.

सदर घटना भडगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. तरुणाशी माझे लग्न करून द्या, असे सांगून तरुणाची आई आणि वहिनीला तरुणीने यादरम्यान मारहाण करत घरसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावातील तरुणीचे संबंधित तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरुणाशी लावून द्या, अशी मागणी करत तरुणाच्या घरात घुसून तरुणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ करत माहराणही केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या करून घेईन, अशी धणकीही तरुणीने मुलाच्या नातेवाईकांना दिली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.