हिराचंद्र महाराजांचे कार्य कायम संस्मरणीय

0

 

[] प्रवचन सारांश 30/10/2022 []

 

काही व्यक्ती आपल्या कार्याची अमिट छाप सोडून जातात. त्या प्रमाणे आचार्य. पू. हिराचंदजी महाराजांचे कार्य  संस्मरणीय असणार आहे. अशा मोठ्या व्यक्तींचे कार्य,चरित्र त्यांचे स्मरण करून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण कार्यरत राहू या असे पु. पदमचंद्र म.सा. यांनी प्रवचनात सांगितले.

सुख किंवा दु:खात मोक्ष प्राप्त झालेल्याचा उल्लेख आगम शास्त्रात आलेला आहे. जीव संसारातीत अनेक योनीत जन्माला आला. देव आणि नरक गती देखील भोगली आहे. ‘मेरी भावना’ प्रवचन शृंखलामध्ये पु. पदमचंद्र म.सा.  यांचे सुशिष्य पूज्य जय पुरंदर म.सा. यांनी प्रवचन केले.

प्रवचनापूर्वी आचार्य हिराचंद्रजी महाराज यांचा दीक्षादिन साजरा करण्यात आला. उपस्थित श्रावक-श्राविकांनी आचार्य हिरा महाराज यांचे स्मृतिंना उजाळा दिला. त्यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल, चरित्र विषयी  विचार व्यक्त करून, गीत गायनाच्या माध्यमातून गुणानुवाद केला.

जळगाव येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर  आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. डॉ पदमचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात श्रावक श्राविका दैनंदिन प्रवचनाचा लाभ घेत आहेत.

अनुपेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे विशेष प्रवचन झाले. गुरूंच्या कृपेमुळे सामान्यातील सामान्य माणूस असामान्य काम करू शकतो. आचार्य हस्तीमलती महाराज आणि आचार्य हिराचंदजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण होते. हिरा नावाप्रमाणे त्यांनी कार्य केले. कोणत्याही राज्यात ते गेले तर तेथे त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली आहे.

राग, द्वेष न पसरवता चांगल्या गोष्टीचे अनुसरण करायला हवे. जीनशासनला चार ही दिशांनी पसरवायाचे कार्य करायला हवे. आचार्य हिराचंद्र महाराज यांच्चा कार्याचे स्मरण आपण प्रत्येकाने करावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांनी प्रवचनात केले.

1 नोव्हेंबर रोजी स्वामी चांदमलजी महाराज यांचा स्मृतिदिन साजरा होणार आहे. त्यात प्रत्ययेकाने सहभागी व्हावे दया, एकासना, उपवास करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.