वाडी येथे ४० क्विंटल कापसाची चोरी ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;- पाचोरा तालुक्यातील वाडी येथे शेतकर्याने ठेवलेला ४० क्विंटल कापूस , पितळी पातेले , बैल नसलेली लोखंडी गाडी असा एकूण ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत माहिती अशी कि , वाडी येथील रहिवाशी असलेले साधना गणेश भोसले यांनी ३ लाख रुपये किमतीचा ४० क्विंटल कापूस एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला होता . तसेच ऍल्युमिनिअम, आणि पाटलाचे साडेचार हजार किमतीचे पातेले , पाण्याचे टॅप , संसारोपयोगी साहित्य आणि बैल नसलेली ३० हजर रुपये किमतीची लोखंडी गाडी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचा प्रकार १६ रोजी पर्यंत उघडकीस आला . याप्रकरणी तक्रार दिल्यावरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना रवींद्रसिंग पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.