विटनेर येथून दोन गायी चोरल्या

0

पारोळा ;- तालुक्यातील विटनेर येथे जर्सी जातीच्या २४ हजार रुपये किमतीच्या गायी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, विटनेर येथील शेतकरी रमेश धनसिंग पाटील यांच्या जर्सी जातीच्या प्रत्येकी १२ हजार रुपये किमतीच्या गायी १४ रोजी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला . आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता गायी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी रमेश पाटील यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल; करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.