केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार केळी फळ पिक विम्याचा लाभ – खा. रक्षाताई खडसे

0

मुक्ताईनगर ,लोकशाही न्यूज नेटवर्क

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की चालू महिन्यात दि.१० मे ते १५ मे २०२३ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ५० महसूल मंडळात सलग ५ दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने; केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असुन सदर शेतकऱ्यांना रु.४३,५००/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.

तसेच या पूर्वी जानेवारी महिन्यात सलग ३ दिवस कमी तापमानामुळे प्रति हेक्टर रक्कम रु.२६,५००/- असे (कमी व जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईचे मंजुर होणार आहेत) मंजूर झाले होते. अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली

दि.१० मे ते १५ मे २०२३ दरम्यान जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जळगांव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

रावेर लोकसभा क्षेत्र –
रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
चोपडा : अडावद, लासूर, धानोरा प्र., चोपडा, गोरगावले, हातेड बु. चाहार्डी.
मुक्ताईनगर : घोडसगाव, अंतूर्ली, कुऱ्हे, मुक्ताईनगर.
यावल : भालोद, साकाळी, किनगाव बू., बामणोद, यावल, फैजपूर.
भुसावळ : वरणगाव, पिंपळगाव खु., भुसावळ.

जळगांव लोकसभा क्षेत्र –
जळगाव : पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद, नशिराबाद.
अमळनेर : अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, शिरुड, वावडे.
चाळीसगाव : शिरसगांव.
धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
एरंडोल : एरंडोल, रिंगनगांव.
पारोळा : तामसवाडी.
भडगाव : भडगाव.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.