अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या स.पो.नि. रुपाली पाटील यांचा सत्कार

0

चाळीसगाव;- महामार्ग पोलीस स्टेशनच्या स.पो.नि. रुपाली पाटील यांना अपघाताची सूचना मिळताच तातडीने घटना स्थळी पोहचून अपघात ग्रास्तांचे प्राण वाचविल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्याहस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

२६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वा. चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. हद्दीतील कन्नड घाटात तवेरा वाहन क्र. एम.एच.४१ व्ही ४८१६ हे अपघात ग्रस्त होऊन प्रवाशांसह ३०० फुट खोल दरीत कोसळल्याची माहिती पोलीस प्रशासनास प्राप्त झाली होती. सदर माहिती प्राप्त होताच स.पो.नि. रुपाली पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ पोहचुन, बचाव पथकातील इतर कर्मचारी व अधिकारी यांच्याशी उत्तम रित्या समन्वय साधुन, बचाव पथकाकडे कोणतेही इतर साहित्य नसतांना फक्त दोराचे सहाय्याने दरीत अडकुन पडलेल्या ११ जखमी प्रवाश्यांना बाहेर काढले.त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याने त्यातील ७ प्रवाशांचा जीव वाचविण्यात यश प्राप्त झाले . हे बचावकार्य चालु असतांना दाट धुके, अंधार, पाऊस यांचा सामना करून जीवाची पर्वा न करता दरीत ऊतरूण स.पो.नि. रुपाली पाटील यांनी कार्य पुर्णत्वास नेले. याबद्दल पोलीस दलास सार्थ अभिमान आहे. आपल्या कार्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यास मदत झाली आहे. आम्ही भविष्यात आपणाकडुन अशाच उत्तम कामगिरी अपेक्षा करून आपले शुभेच्छांसह अभिनंदन करतो.अशा शब्दात अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी कौतुक केले. .

Leave A Reply

Your email address will not be published.