भडगाव येथे सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी याच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेधार्थ आज भडगाव तालुका करणी सेना व महाराणा प्रतापसिंहजी जयंती उत्सव समिती भडगाव तालुका त्यांच्या वतीने भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे व भडगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आनंद सिंग राजपूत, विजय पाटील, शरद राजपुत, ज्ञानेश्वर ठाकरे, नरेंद्र राजपुत, जयंतीलाल परदेशी, प्रकाश राजपुत, ओमप्रसाद राजपुत, राजेंद्र परदेशी, नवल राजपुत, भास्कर राजपुत, मोतीलाल पाटील, झुंबर राजपुत, शरद आण्णा राजपुत, सुनिल पाटील, मुन्ना परदेशी व सर्व राजपुत समाज बहु संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.