स्व सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येचे निषेधार्थ मलकापुर शहरात कडकडीत बंद

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष स्व.सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मलकापूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहरातील सर्व प्रतिष्ठाने, दुकाने कडकडीत बंद ठेवून व्यापारी, उद्योजक, अडते, भाजीपाला व्यावसायीकांनी या बंदला उस्फुर्त पाठींबा दर्शविला. तर हत्या करणाऱ्या आरोपीं विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालविण्यात यावा व त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज ११ डिसेंबर रोजी सकल क्षत्रिय राजपूत समाज मलकापूर तालुका व शहर, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना मलकापूरच्या वतीने महामहीम राष्ट्रपती नवी दिल्ली यांच्याकडे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्पâत करण्यात आली.

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष स्व.सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सकल क्षत्रिय राजपूत समाज बांधवांच्या वतीने सर्वप्रथम शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकावर एकत्रित येऊन शहीद संजयसिंह राजपूत यांच्या समाधीस्थळी माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर स्व.सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर शांततेच्या मार्गाने जाऊन तहसीलदार राजेश सुरडकर यांना स्व.सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या हत्यार्यांविरोधात फास्र्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा व आरोपींना लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी मंगलसिंहदादा राजपूत, लकीराज शेखावत, विरसिंहदादा राजपूत, शैलेंद्रसिंह राजपूत, रामभाऊ झांबरे, गौरव राजपूत यांचेसह सकल राजपूत समाज बांधवांसह विविध समाजातील नागरिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.