लोकशाही न्यूज नेटवर्क
आजकाल अनेकजण वाहन खरेदी करताना सर्वात आधी टाटा मोटर्सला प्राधान्य देतात. कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता येत्या नवीन वर्षात टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवणार असल्याचे समोर येत आहे. बाबतीत स्वतः कमानीने माहिती दिली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी व्यायवसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
याआधी मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा आणि ऑडी या कंपन्यानी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. टाटा एस, टाटा इंट्रा आणि टाटा विंगर यासारख्या अनेक मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. ” आम्ही आमच्या प्रवासी आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किंमती जानेवारीमध्ये वाढवण्याचा विचार करत आहोत.
नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा मोटर्सच्या जागतिक वाहन विक्रित १.७३ टक्के घट दिसून आली आहे. २०२२ नोव्हेंबरमध्ये ७५,४७८ युनिट्स विकले गेले होते. त्या तुलनेत ७४,१७२ युनिट्सची नोंद या महिन्यात नोंदवण्यात आली आहे.