ब्रेकिंग; चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

चाळीसगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. दरम्यान त्यांना घटनेनंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवकारवर अज्ञात तरुणांनी गोळीबार हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार केला. माजी नगरसेवक महेंद्र मोरे कार्यालयात बसले होते. दरम्यान त्याचवेळी अज्ञात तरुणांनी महेंद्र मोरे यांच्या गोळीबार केला. अज्ञात तरुणांच्या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबारात महेंद्र मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कारमधून पाच जण उतरताना दिसत आहेत. अज्ञात तरुणांनी रुमाल बांधल्याचे दिसत आहे. व्हिडिओत पाचही जणांच्या हातात बंदूक दिसत आहे. त्यांनीच माजी नगरसेवकावर गोळीबार केला. या गोळीबारात मोरे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. गोळीबार का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गोळीबारानंतर पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.