जळगावातील तरुणाचे टोकाचे पाऊल, रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे आले आहे. हरिविठ्ठल नगरजवळ रेल्वेरुळावर धावत्या रेल्वे खाली सापडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला.

सोमवारी (ता.५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दीपक भगवान महाजन (वय-३१ रा. समता नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक महाजन मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी (दि.५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तो हरिविठ्ठल नगरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर आल्याने गंभीररीत्या जखमी झाला.

माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलिस कर्मचारी अनिंद्र नगराळे आणि देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

स्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीवरून, जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. मृत व्यक्तीच्या पश्चात आई-वडील, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.