धक्कादायक; चालत्या कारवर पडला 20 फूट उंचीवरून 50 किलोचा गर्डर…

0

 

गाझियाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दिल्ली – डेहराडून एक्स्प्रेसवेच्या बांधकामाधीन ठिकाणी सुमारे 20 फूट उंचीवरून चालत्या कारवर 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा लोखंडी गर्डर पडला. त्यामुळे कारचे नुकसान झाले. सुदैवाने कार चालक सुखरूप बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पण, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली ते डेहराडून असा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे बनवला जात आहे. हा एक्स्प्रेस वे एलिव्हेटेड आहे. 4 फेब्रुवारी रोजी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कांधला येथून एक कार दिल्लीच्या दिशेने जात होती. कार गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील पवी गावाजवळ आली असता, अचानक लोखंडी गर्डर काच फोडून आत आली आणि स्टेअरिंगमध्ये अडकली.

स्टेअरिंगमध्ये गर्डर अडकले नसते तर गाडी चालवणाऱ्या तरुणाला जीव गमवावा लागला असता. गाडीतील तरुणाला कळेना अचानक काय झाले? तो भांबावलेल्या अवस्थेत लगेच गाडीतून उतरला. यानंतर हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच्या अगदी वरती एक्स्प्रेस वेचे बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले आणि यादरम्यान सुमारे 20 फूट उंचीवरून लोखंडी गर्डर कोसळला.

या संपूर्ण प्रकरणामध्ये एसीपी सूर्यबली मौर्य म्हणाले की, पीडित तरुणाने पोलिसांकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. दोन्ही पक्षांनी परस्पर सामंजस्य करार केला आहे. सुरक्षितता लक्षात घेऊन बांधकाम कंपनीला सुरक्षा नियम पाळून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.