विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

जळगाव ;-विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार जळगाव शहरातील खंडेराव नगरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या विवाहितेला आला आहे. याप्रकरणी र रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खंडेराव नगरातील माहेर असलेल्या कोमल सनी पाटील (वय-२०) यांचा विवाह पाचोरा येथील सनी राजेंद्र पाटील यांच्याशी जानेवारी २०२२ मध्ये झालेला आहे. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, सासरे व नणंद यांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी खंडेराव नगरात निघून आल्या. रविवारी २५ जून रोजी दुपारी १२ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती सनी राजेंद पाटील, सासरे राजेंद्र नारायण पाटील, सासू सुनिता राजेंद्र पाटील आणि नणंद काजल राजेंद्र पाटील सर्व रा. पाचोरा यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.