तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- काहीही कारण नसतांना एका तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबेरखान उस्मानखान (वय-३५) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना त्याच परिसरात राहणरे शेख मुसा शेख पिरन, शेख समिर शेख मुसा, शेख अस्लम शेख पिरण आणि शेख इब्राहिम शेख पिरण या चौघांनी जुबेर खान याला शिवीगाळ, मारहाण करत धारदार वस्तूने बेदम मारहाण केली. यात जुबेर खान हा जखमी झाला.

फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख मुसा शेख पिरन, शेख समिर शेख मुसा, शेख अस्लम शेख पिरण आणि शेख इब्राहिम शेख पिरण या चौघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील करीत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.