मिनी स्कूल बस घेऊन देण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0

सावदा ;- शाळेत मुले सोडण्यासाठी मिनी स्कूल बस घ्यायचे असल्याने तुझ्या बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून मानसिक छळ केल्याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रजिया बी शेख रहीम वय 22 राहणार काजीपुरा सावदा तालुका रावेर हे फिर्यादीचे माहेर असून तिचे लग्न शेख रहीम शेख रज्जाक याच्याशी झाले असून दिनांक 4 ऑक्टोबर 2022 पासून ते जानेवारी 2023 पर्यंत आरोपी पती शेख रहीम शेख रजा ,ननंद रेश्मा रज्जाक दोन्ही राहणार सिल्वासा गुजरात पूर्ण नाव गाव माहित नाही ,रोशन पूर्ण नाव गाव माहित नाही, रोशन बी सासू पूर्ण नाव गाव माहित नाही, रफिका पूर्ण नाव गाव माहित नाही ,समीर राहणार पुणे ,पूर्ण नाव गाव माहित नाही आदींनी फिर्यादी रजिया बी शेख हिचा माहेर होऊन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला या छळाला कंटाळून तिने माहेरी आल्यानंतर सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय देवरे करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.