गिरीश महाजनांविरोधात गुन्ह्याची चौकशी आता सीबीआय करणार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;  

राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. मात्र मविआ सरकारने घेतलेले निर्णय हद्दपार करण्याचे सत्र नव्या युती सरकारने लावले आहे. त्यात एक महत्वाचे गिरीश महाजन यांच्या प्रकरणाचे सूत्र महाराष्ट्र पोलिसांकडून थेट CBI ला वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणून ख्यातीप्राप्त नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह इतर २८ जणांविरोधात गुन्ह्याची चौकशी थेट CBI करेल.

गिरीष महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा तसंच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल (Phone Tapping Case) लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे. शिंदे सरकरकडून राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने तसे निर्देश पोलिसांना दिले आहे. आ. गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा दाखल गुन्हा आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 29 आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआय करणार आहे.

या खळबळजनक प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी येत्या दिवसात समोर येणार असल्याचं बोललं जात आहे. तत्कालीन सरकारी वकील प्रविण चव्हाण, काही पोलीस अधिकारी तसेच काही बडे राजकीय नेते आता CBI च्या रडारवर येणार आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल संबंधित गुन्हा खरा आहे की खोटा ? याचाही तपास केला जाणार आहे. जर हा गुन्हा खोटा असल्याचा सिद्ध झाला तर यातील फिर्यादिच्याही अडचणी वाढणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.