दोघांनी मिळून सरकार चालवायचे असे दिसते – शरद पवार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर रुजू झाल्याच्या नंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, शरद पवार म्हणाले आहे की, शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे दिल्लीच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडणे हे आहे. पण भाजपमध्ये वरिष्ठांच्या आदेशाबाबत तडजोड करता येत नाही हे फडणवीस यांनी दाखवून दिल्याचा टोमणा पवारांनी लगावून त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत ‘त्यांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,’ असे खोचक उत्तर दिले. तसेच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विचारले असता पवार यांनी, सरकारच दोघांनी मिळून चालवण्याचे ठरलेले दिसते. दोघांनी संपूर्ण सत्ता केंद्रीत ठेऊन सरकार चालवायची भूमिका स्वीकारलेली दिसते असेही पवार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.