टवाळखोरांकडून बसमध्ये विद्यार्थिनींची छेड; चालकाने बस आणली थेट पोलीस स्टेशनला…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील नवीन बसस्थानकाहून निघालेली बस गंतव्य स्थानावर न जाता थेट तालुका पोलीस स्तेषांमध्ये पोहोचल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

दुपारी १.३० वाजता शहरातील नवीन बसस्थानकाहून (एम.एच.८०,वाय ५१९३) जळगाव-नांदगाव ही बस निघाली. या बसमध्ये नांदगाव, कानळदा, नांद्रा, फेसर्डी या भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह इतर प्रवाशांचीही खच्चून भरले होते. बस आव्हाणे फाट्याच्या पुढे गेल्यानंतर बसमधील एका टवाळखोराने इतर साथीदारांच्या मदतीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. टवाळखोराने विद्यार्थिनींची छेड काढल्यानंतर, विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी संबधित टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही संबधित टवाळखोराकडून बसमध्ये गोंधळ घालून, विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करण्याचा प्रयत्न सुरु होताच. त्यानंतर विद्यार्थिनींना होणारा त्रास वाढल्याने, वाहक लोटन पाटील यांनी चालक तुकाराम रायसिंग यांना बस थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये नेण्याच्या सूचना दिल्या. नांद्रा गाव केवळ १ किमी वर असताना चालकाने बस गावात न नेता थेट जळगावकडे पुन्हा फिरवली.

यामुळे पोलीसांच्या भितीने घाबरलेल्या टवाळखोर युवकाने बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बस न थांबवता, तालुका पोलीस स्टेशनकडे नेली. बस थांबणार नाही, हे कळल्यामुळे संबधित युवकाने पोलीसांकडे नाव सांगणाऱ्यांना थेट चॉपर दाखवून धमकी दिली. त्यातच आव्हाणे फाट्याजवळ युवकाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारली. आणि त्याठिकाणाहून पसार झाला. मात्र, चालकाने तरीही बस तालुका पोलीस स्टेशनला आणली. या प्रकरणी विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.